कोरोनावर मात करण्यासाठी राज्यभरात लसीकरणावर भर देण्यात आला आहे. पण, लशीचा साठा कमी असल्यामुळे लसीकरण केंद्रावर लोकांची गैरसोय होत आहे. अनेक लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की आली आहे. तर काही ठिकाणी 45 पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लशीचा दुसरा डोस दिला जात आहे.