'दगडूशेठ'चे गणपती बाप्पा श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झालेले आहेत. याठिकाणी करण्यात आलेली सुंदर सजावट पाहण्यासाठी आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रविवारी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यावर्षी साकारण्यात आलेल्या 'श्री पंचकेदार मंदीर' सजावटीसमोर गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी केली.
2/ 7
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे यावर्षी साकारण्यात आलेल्या 'श्री पंचकेदार मंदीर' सजावटीसमोर गणेशभक्तांनी प्रचंड गर्दी केली.
3/ 7
या गर्दीची छायाचित्रे ड्रोनद्वारे टिपण्यात आली आहेत.
4/ 7
भगवान शिवशंकरांचे निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सानिध्यात श्रीपंचकेदार मंदिरप्रासाद विराजमान आहे.
5/ 7
हे मंदिर केवळ देखावा नसून याच्या उभारणीत अनेक प्रतिकांचा, मूर्तींचा आणि अनेक दिव्यांचा वापर केलेला आहे.
6/ 7
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा यंदाची सजावट असलेल्या श्री पंचकेदार मंदिरात विराजमान झाले आहेत. या बाप्पाचं यंदाचं डेकोरेशन पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे.
7/ 7
गणेश चतुर्थीला सकाळी गुजरात गिरनार येथील गुरु दत्तात्रेय पिठाधीश्वर स्वामी श्री महेशगिरी महाराज यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली होती.