गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचे तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे... नागपुरातील SDRF च्या जवानांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले सिरोंचा तालुक्यात सोमनुर येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या तीन गर्भवती महीला आणि चार आजारी वृध्दांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तीन गर्भवती महीलांना बाहेर काढल्यानंतर नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. मुसळधार पावसाने सिरोंचा तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. सिरोंचाचे तहसिलदार जितेंद्र शिकतोडे यांनी स्वतः जाऊन या सगळयांना सुरक्षीत बाहेर काढले सिरोंचा तालुक्यात सोमनुर येथील पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत आहे.