कोरोना काळातल्या संचारबंदीमुळे पंढरपुरातला सभामंडप ऐन कार्तिकी यात्रेच्या दिवशी एवढा सुना सुना दिसत असला तरी फुलांच्या सुंदर सजावटीने विठूमाऊलीचं मंदिर कसं सजलंय याचं व्हर्च्युअल दर्शन
|
1/ 8
आषाढीनंतर कार्तिकी एकादशीसुद्धा पंढरपूरला Coronavirus च्या भयछायेखाली साजरी होणार आहे.
2/ 8
वारकरी, भक्तमंडळी कमी असली, तरी पंढरीचा उत्साह कमी नाही.
3/ 8
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरातली सगळी मंदिरं अशी फुलांनी मढली आहेत.
4/ 8
मुख्य विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात फुलांचीच आरास आहे.
5/ 8
मोगऱ्याच्या माळा आणि गजऱ्यांनी जणू विठ्ठलावर सुगंधी अभिषेक सुरू असल्याचा भास या सजावटीतून होतो.
6/ 8
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा होणार आहे.
7/ 8
कोरोना काळातल्या संचारबंदीमुळे विठ्ठल मंदिराचा सभामंडप ऐन कार्तिकी यात्रेच्या दिवशी एवढा सुना सुना दिसतो आहे.