'3 महिने झाले हो, आमचा आमदार होता तो, कुठे गेला सध्या तो' शिवसेना आमदाराच्या मतदारसंघात बॅनरबाजी, PHOTOS
'ओवळा माजिवाडाचे आमदार हरवले, आपण पाहिले का? असे मजूकर असलेले बॅनर्स ठाण्यातील माजिवाडा भागात ठिकठिकाणी पाहण्यात मिळत असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (shiv sena mla pratap sarnaik) यांचा हा मतदासंघ आहे.
|
1/ 8
ओवळा माजिवाडाचे आमदार हरवले, आपण पाहिले का? असा मजूकर असलेले बॅनर ठाण्यातील माजिवाडा भागात ठिकठिकाणी पाहण्यात मिळत असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
2/ 8
ठाणे शहरात ठीकठिकाणी ओवळा माजिवडाचे आमदार हरवले असल्याचे पोस्टर लावले आहेत.
3/ 8
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा हा मतदारसंघ आहे.
4/ 8
या पोस्टरवर सर्वसामान्य मतदार असे लिहिले आहे.
5/ 8
'तीन महिने झाले हो...आमचा आमदार होता तो...कुठे गेला सध्या तो..झाला गायब हो तो...' असा गंमतीशीर मजकूरही बॅनरवर आहे.
6/ 8
अवैध संपत्ती गोळा केल्या प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे.
7/ 8
सरनाईक यांचा मुलाची आणि कुटुंबीयांचीही चौकशी झाली असून ठीकठिकाणी असलेल्या ऑफिस आणि घरांवर ईडीने छापे मारले होते.
8/ 8
सरनाईक यांनी कोर्टात धाव घेतली असून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. पण, मतदारसंघात कोरोनाच्या काळात गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असल्यामुळे अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.