नव्या वर्षाची नवीन सुरुवात आपण देवाच्या दर्शनानं करतो. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्षात जरी देवदर्शनाला जाता आलं नाही तरी नव्या वर्षाची सुरुवात घरबसल्या दर्शन घेता येणार आहे.
2/ 8
नव्या वर्षानिमित्तानं पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
3/ 8
फुलांसोबतच पारंपरिक महाराष्ट्राच्या संस्कृतीचा साज असलेल्या वाद्यांची चित्र देखील सजावटीसाठी लावण्यात आली आहे. रंगीबेरंगी फुलांनी विठुरायाचा गाभारा सजला आहे.
4/ 8
नवीन वर्ष निमित्त श्री.विठ्ठल - रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात सुंदर व मनमोहक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे
5/ 8
प्रत्येक सणवाराला विठुरायाचा गाभारा आकर्षक पद्धतीनं सजवला जातो. ही सजावट मनमोहक असते.
6/ 8
नव्या वर्षाची सुरुवात अगदी प्रसन्न करणारी ही सजावट आहे. पिवळ्या-केशरी फुलांनी विठुरायाचा गाभारा सजला आहे.