नोकरीची सुवर्णसंधी : 10वी पास तरुणांसाठी पोस्टात 3650 जागांसाठी भरती, असा करा अर्ज
महाराष्ट्रात पोस्ट खात्यात विविध विभागंमध्ये तब्बल 3650 जागांसाठीची भरती सुरू झालीय. विशेष म्हणजे या नोकरीसाठी काही उच्च शिक्षणाची अट नाही. फक्त 10वी पास ही शिक्षणाची किमान अट आहे. त्यामुळे सामान्य तरुणांना ही मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

देशात आर्थिक मंदीचं सावट आहे. नोकरीच्या संधी कमी होत आहेत. सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आलीय. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत 10 वी पास झालेल्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झालीय.

महाराष्ट्रात पोस्ट खात्यात विविध विभागंमध्ये तब्बल 3650 जागांसाठीची भरती सुरू झालीय. विशेष म्हणजे या नोकरीसाठी काही उच्च शिक्षणाची अट नाही. फक्त 10वी पास ही शिक्षणाची किमान अट आहे. त्यामुळे सामान्य तरुणांना ही मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण डाक सेवक, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि ब्रांच पोस्ट मास्टर पदासाठी ही भरती प्रक्रिया असून 1 नोव्हेंबरपासून भरतीय प्रक्रिया सुरू झालीय. 30 नोव्हेंबर 2019 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर त्यासाठीचे अर्ज भरता येणार आहे.

नोकरीसाठी किमान शिक्षण 10वी आणि त्याचं वय किमान 18 वर्ष तर कमाल 40 वर्ष असावं अशी अट आहे. ST आणि SC कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी वयाच्या नियमांत 5 वर्षांची सूट आहे.

ST आणि SC कॅटेगरीतल्या उमेदवारांसाठी परीक्षा फी सुद्धा माफ करण्यात आलीय. तर इतरांसाठी 100 रुपये फी असणार आहे. त्याचबरोबर कम्युटरचं आणि मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे.