

डोंबिवलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडे मोठा शस्त्रसाठा सापडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्राद्वारे भाजपवर हल्लाबोल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारला आहे.


'या शस्त्रांचा वापर करून भाजपला देशात कोणत्या दंगली घडवायच्या होत्या, याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण द्यावं,' अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.


धनंजय कुलकर्णी असं या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. कल्याण गुन्हे शाखेनं धनंजय कुलकर्णी याच्या दुकानावर धाड टाकत हा शस्त्रसाठा जप्त केला आहे.


धनंजय कुलकर्णी या डोंबिवलीतील भाजपचा उपाध्यक्ष असून त्याचे स्थानिक भाजप आमदाराशी अत्यंत जवळचे संबंध असल्याचं बोललं जात आहे.


भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये चॉपर, तलवारी, एयरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी यांचा समावेश आहे.


लोकसभा आणि विधानसभा जवळ आल्या आहेत. अशातच हा शस्त्रसाठा सापडल्याने कटाची शक्यतादेखील वर्तवण्यात येत आहे.