नाशिकमध्ये तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे नाशिककर त्रस्त आहेत. उष्णतेचा तडाखा वाढल्यानं घराबाहेर पडतानाही नाशिककर डोकं झाकलं जाईल याची विशेष खबरदारी घेत आहेत. नाशिकमध्ये आज (25 मे 2023) रोजी किमान तापमान 23 आणि कमाल तापमान 36 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील काही दिवस उन्हाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीय. उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी संपूर्ण खबरदारी घ्यावी. दुपारी महत्त्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये, अशी सूचना प्रशासनानं दिलीय.