काश्मीर नाही नंदुरबार, शेताचं प्रचंड नुकसान, गारपिटीच्या कहराचे 10 Photo
नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झोडपलं आहे. नंदुरबारमध्ये तर मागच्या चार दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. आता तर लिंबाएवढ्या गारांनी शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सलग अवकाळी पाऊस आणि गारपीट सुरूच आहे.
2/ 10
वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे.
3/ 10
आज दुपारनंतर आलेल्या पावसाने तर एक तास चांगलंच झोडपलं आहे.
4/ 10
खासकरुन नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील सीमावर्ती गाव असलेल्या आष्टे , ठाणेपाडा , सिंदबन आणि छडवेल कोर्डे भागाच्या परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे.
5/ 10
याआधी 6 मार्चलाही याच भागात गारपीट झाली होती, त्यामुळे प्रचंड नुकसान झालं होतं.
6/ 10
अशातच चार दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस, गारपीट आणि त्यातच शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रखडलेले पंचनामे यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे.
7/ 10
नंदुरबारप्रमाणेच धुळे जिल्ह्यालाही पुन्हा एकदा गारपिटीने झोडपले आहे.
8/ 10
धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील छडवेल कोर्डे, सिंदबंन, आष्टी परिसरात गारपीट झाली आहे.
9/ 10
या गारपिटीमध्ये अक्षरश: लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या आहेत. मागच्या 15 दिवसांमधली ही दुसरी गारपीट आहे.
10/ 10
सलग दुसऱ्यांदा झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी करत आहे.