हिंदू-मुस्लीम धर्मियांच्या ऐक्याचे प्रतीक असलेले नागपुरात प्रसिध्द ताजाबाद हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 27 जानेवारी हा दिवस सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन यांची जयंती म्हणून साजरी करण्यात येतो. शहरातील छोटा व मोठा ताजबाग अर्थात ताजाबाद शरिफमध्ये भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. संपूर्ण परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आला आहे. मध्यरात्रीपासूनच जागोजागी केक कापण्यात येत असून ठीक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हजरत ताजुद्दीन बाबा हे इतर सर्व आध्यात्मिक व्यक्तींप्रमाणेच होते. त्यांना त्यांच्या करुणेसाठी ओळखले जायचे. संत ताजुद्दीन बाबा यांनी कधीही कुठलीही भौतिक सुखाची इच्छा केली नाही. ताजुद्दीन बाबांचा जन्म 27 जानेवारी 1861 रोजी नागपूरजवळील कामठी येथे झाला.