गुजरातचे मुख्यमंत्री ते देशाच्या पंतप्रधानपदाची दुसरी टर्म नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाला 20 वर्षे झाली आहेत.
2/ 9
पंतप्रधान मोदींचे राजकीय व्हिजन, त्यांची विचारधारा असा सर्व प्रवास कलावंतांनी कॅनव्हासवर साकारला आहे.
3/ 9
पूर्व भारतातील प्रीमियर आर्ट गॅलरी सुवद्रा आर्ट गॅलरी, भुवनेश्वरच्या वतीनं MODI@20 या राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन नागपूरच्या जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी प्रांगणात आयोजित करण्यात आलं आहे.
4/ 9
देशभरातील 50 प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात पाहण्याची संधी नागपूरकरांना आहे.
5/ 9
या सर्व कलाकारांनी पंतप्रधान मोदींच्या आजवरच्या आयुष्यातील तसंच राजकीय कारकिर्दीमधील महत्त्वाचे प्रसंग चित्रांच्या माध्यमातून दाखवले आहेत.
6/ 9
भुवनेश्वर, गुवाहाटीनंतर या प्रकारचं तिसरं प्रदर्शन नागपूरमध्ये भरवण्यात आलंय.
7/ 9
गुजरातचे मुख्यमंत्री तसंच देशाचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमधील महत्त्वाचे टप्पे यामध्ये दाखवण्यात आले आहेत.
8/ 9
देशातील 10 प्रमुख शहरांमध्ये या प्रकारचे प्रदर्शन होणार असून त्यामध्ये स्थानिक कलाकारांना संधी दिली जाईल.
9/ 9
नवी दिल्लीमध्ये नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या G20 परिषदेच्या दरम्यान या प्रदर्शनाचा समारोप होईल.