नागपूरसह विदर्भातील तापमानात कमालीचा बदल जाणवत आहे. तापमानात मोठी वाढ झाली असून येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
2/ 6
शहरातील उन्हाची दाहकता लक्षात घेता वर्दळीचे रस्तेही दुपारी सूनसान दिसत आहेत.
3/ 6
नागपुरात काल 25 मे रोजी कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 26.6 अंश सेल्सिअस होते.
4/ 6
आज 26 मे ते 27 मे दरम्यान तापमान कोरडे असणार आहे. मात्र विदर्भासह नागपुरात उष्ण हवामान आणि उष्ण घाताची शक्यता आहे. त्यामुळे योग्य ती खरदारी घ्यावी अशी सूचना प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
5/ 6
पुढील 24 तासात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही व त्यानंतर पुढील दिवसात तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होईल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
6/ 6
उष्णतेची दाहकता लक्षात घेता सोबत पिण्याचे पाणी, रुमाल, टोपी, सन कोट इत्यादी बाळगावे. तसेच आवश्यकता नसल्यास दुपारी घराबाहेर न पडण्याचे नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.