नागपूरसह विदर्भातील तापमानात कमालीचा बदल जाणवत असून तापमानात मोठी वाढ झाल्यानंतर पुन्हा पावसाचे पुनरागमन आगमन होणार असल्याचा इशारा नागपुर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
2/ 7
उष्माघाताच्या घटना वाढल्याने शहरातील अनेक चौकातील सिग्नल्स दुपारच्या वेळी वाहतूक पोलिसांनी बंद केले आहेत.
3/ 7
शहरातील उन्हाची दाहकता लक्ष्यात घेता एरवी वर्दळीच्या ठिकाणी देखील रस्ते दुपारच्या वेळी सूनसान झाले आहेत.
4/ 7
नागपुरात काल 22 मे रोजी कमाल तापमान 43.5 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 27.6 अंश सेल्सिअसची नोंद झाली.
5/ 7
आज 23 मे रोजी नागपुरात काही ठिकाणी तुरळक पाऊसाचे आगमन होणार आहे. त्यात 30-40 प्रती तास वेगाने विजांच्या कडकडाटासह वादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
6/ 7
त्यामुळे दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमान घसरण्याचे अंदाज वर्तवण्यात आला आहे.
7/ 7
उष्णतेची दहाकता लक्षात घेता सोबत पिण्याचे पाणी, रुमाल, टोपी, सन कोट इत्यादी बाळगावे. तसेच आवश्यकता नसल्यास दुपारी घरा बाहेर न पडण्याचे नागपूर प्रादेशिक केंद्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.