G20 परिषद 2023 चे यजमानपद भारताकडं असून संपूर्ण देशासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. या परिषदेसाठी 29 देशातील 250 प्रतिनिधींचे नागपूर नगरीत आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपराजधानी नववधू प्रमाणे सजली आहे. नागपूरमध्ये दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीच्या निमित्तानं संपूर्ण शहरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलावर खास रोषणाई करण्यात आलीय. नागपूर शहारतील ऐतिहासिक झिरो मील परिसराची काही दिवसांपूर्वी दुरावस्था झाली होती. G20 परिषदेमुळे तो परिसरही चकाचक झालाय. टायगर कॅपिटल अशी नागपूरची ओळख आहे. या परिषदेच्या निमित्तानं विमानतलावर टाकाऊ वस्तूंपासून वाघाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या संपूर्ण सजावटीमुळे आपण विदेशात फिरत असल्याची प्रतिक्रिया नागपूरकर व्यक्त करत आहेत. नागपूरमधील प्रमुख रस्त्यांवर तसेच झाडावंरही दिव्यांचा झगमगाट करण्यात आला आहे.