नागपुरातील सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या मुख्यमंत्री निवास अर्थात ‘रामगिरी’ बंगल्यापुढील मार्ग वॉकर स्ट्रीट म्हणून ओळखला जातो.
2/ 13
गर्द वनराईने वेढलेला हा वॉकर्स स्ट्रीट परिसर म्हणजे तमात नागपूरकरांसाठी एक आल्हाददायक आणि आकर्षणाचा भाग आहे. सकाळ संध्याकाळ या रस्त्यावर पायी फिरणाऱ्यांची मोठी गर्दी असते.
3/ 13
या वॉकर्स स्ट्रीटवर चालणाऱ्या नागरिकांचे विविध भाव दर्शविणारे पुतळे (स्टॅचू) साकारण्यात आले आहेत.
4/ 13
विदेशाच्या धर्तीवर नागपुरात राबवलेला हा प्रकल्प सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला आहे. 'वॉकर्स पॅराडाईज' अंतर्गत येथे 11 पुतळे बसवण्यात आले आहेत.
5/ 13
'वॉकर पॅराडाईज’मध्ये शहरातील तरुणाई, ज्येष्ठ, चिमुकले, महिला या सर्वांचे भाव साकारले आहेत.
6/ 13
जॉगर, रनर, रिस्ट वॉकर यासह वजन कमी करण्यासाठी नियमित फिरायला येणारी महिला, श्वानाला घेऊन फिरणारी व्यक्ती असे पुतळे उभारण्यात आले आहेत.
7/ 13
तसेच चिमुकलीला फिरायला घेऊन आलेली आई, नव्या युगातील तरुणी, तरुणांचा ग्रुप, काठीच्या आधाराने फिरणारे वृद्ध असे 11 प्रकारचे पुतळे येथे आहेत.
8/ 13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच या 'वॉकर्स पॅराडाईज' चे उद्घाटन करण्यात आले.
9/ 13
ग्रीन फाऊंडेशनने येथे ‘वॉकर पॅराडाईज’ साकारण्याची संकल्पना मांडली. नागपूर महापालिकेने जागेची उपलब्धता आणि जयस्वाल निको ग्रुपने पुतळे निर्मितीची जबाबदारी स्वीकारून या संकल्पनेला साथ दिली.
10/ 13
यंदा भारताला G20 परिषदेत अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर देशभरासह नागपूर शहरात देखील जय्यत तयारी सुरु आहे.
11/ 13
नागपूर शहरात G20 परिषदेतर्गत नागरी संस्थाची C20 परिषद आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेला विविध देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
12/ 13
C20 परिषद डोळ्यासमोर ठेवून नागपूर शहराचे सुशोभीकरण करण्यात येत असून त्यात शहरातील 'वॉकर्स स्ट्रीट' चा देखील समावेश आहे.
13/ 13
या प्रत्येक पुतळ्या खाली त्या त्या पुतळ्याचे भाव व्यक्त करणारे फलक लावले आहेत.