नागपूर ग्रामीण परिसराच्या बुट्टीबोरी परिसरातील बेला येथील मानस अॅग्रो कंपनीत बॉयलर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. कंपनीत झालेल्या या स्फोटात 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 1 वेल्डर आणि 4 हेल्परचा समावेश असल्याची माहिती आहे. वेल्डिंग करताना ही घटना घडली असून अचानक मानस अॅग्रो कंपनीचा बॉयलर ब्लास्ट झाल्याने 5 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.