नागपंचमीसाठी प्रसिद्ध बत्तीस शिराळ्यात कोरोना निर्बंधांमुळे अशी निघाली मिरवणूक; पाहा PHOTO
नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या 32 शिराळ्यात यंदा अतिशय साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यात आली. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाने निर्बंध लादले होते. (Photo credit - Ganesh Kale)
नागपंचमीसाठी प्रसिद्ध असलेल्या 32 शिराळ्यात यंदा अतिशय साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यात आली.
2/ 9
कोरोना संकटामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही प्रशासनाने निर्बंध लादले होते.
3/ 9
नागरिकांनी आपापल्या घरी नागाच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि सण साजरा करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं होतं.
4/ 9
नागरिकांनी बाहेर न पडता घरीच थांबावं आणि कोरोनाच संभाव्य संसर्ग टाळावा, असं आवाहनदेखील प्रशासनाकडून करण्यात आलं होतं.
5/ 9
नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन केल्याचं चित्र शुक्रवारी दिवसभर दिसलं.
6/ 9
महाजनांच्या वाड्यात नागाचं प्रतिकात्मक पूजन करून मग पालखी अंबामाता मंदिराकडं रवाना झाली.
7/ 9
या पालखीसाठी केवळ 10 जणांना परवानगी देण्यात आली होती.
8/ 9
पालखी मंदिरात पोहोचल्यानंतर केवळ 5 मानकऱ्यांना पूजेसाठी परवानगी देण्यात आली होती.
9/ 9
32 शिराळ्याच्या प्रसिद्ध अंबामाता परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गावाबाहेरील नागरिकांना शिराळ्यात येण्यास मनाई करण्यात आली होती. वेगवेगळ्या परिसरात ड्रोनच्या साहाय्याने हालचालींवर लक्ष ठेतर वलं जात होतं.