गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सूर्य आग ओकतोय. वाढत्या तापमानापासून मुंबईकरांची आजही सुटका होणार नाही. आगामी काही दिवसांमध्येही मुंबई शहरातील तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. मुंबई शहर, उपनगर परिसरात वाढत्या तापमानामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. काल 24 मे रोजी मुंबईमध्ये कमाल तापमान 35° सेल्सिअस तर किमान 29° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज 25 मे रोजी कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 29 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे. येत्या काही दिवसात मुंबईकरांना आणखी उन्हाच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. वाढत्या तापमानामुळे प्रशासनाने उन्हात विनाकारण पडू नये. तापमानापासून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.