महाराष्ट्र सायबरनं प्रत्येक पालकाला केलं मोठं आवाहन, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी
महाराष्ट्र सायबरनं प्रत्येक पालकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
|
1/ 9
लॉकडाऊनमुळे सगळेच जण घरात असल्यामुळे इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर महाराष्ट्र सायबरनं प्रत्येक पालकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे.
2/ 9
पाल्यांच्या ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावं. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असं आवाहन महाराष्ट्र सायबरने केलं आहे.
3/ 9
7 ते 18 वयोगटातील मुलांच्या पालकांनी ऑनलाईन सर्फिंगवर करताना त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवावं. जर मुलं ऑनलाईन चॅटिंग करत असतील तर समोरची व्यक्तीची माहिती करून घेणं आवश्यक आहे.
4/ 9
तुमच्या फोन किंवा घरातील लॅपटॉप आणि कॉम्पुटरद्वारे कोणत्या संकेतस्थळावर क्लीक करत आहेत किंवा कोणते संकेतस्थळ बघत आहेत यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे.
5/ 9
गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे आपली मुलं अशा कोणत्याही जाळ्यात अडकू नये याची काळजी पालकांनी घेणं गरजेचं आहे.
6/ 9
पालकांनी पोर्नोग्राफिक संकेतस्थळ शोधून क्लिक करणं टाळायला हवं. सध्या चाइल्ड पोर्नोग्राफी बघण्याचं प्रमाण वाढत आहे. आपल्या पाल्यास कुणी ऑनइलान धमकावत नाही ना, याची खात्री करायला हवी.
7/ 9
आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्स आणि त्यांचे पिन क्रमांक पाल्यास देण्याचं टाळावं. ऑनलाइन खरेदी करताना मुलांच्या बाजूला बसून सर्व व्यवहार तपासून बघा अशा सूचना महाराष्ट्र सायबरकडून देण्यात आल्या आहेत.
8/ 9
आपला मुलगा कोणत्याही ऑनलाइन फसवणूक (fraud ) किंवा ऑनलाइन रॅकेटमध्ये किंवा चाईल्ड पोर्नोग्राफीचा शिकार बनले अशी माहीत हाती आल्यास घाबरून न जाता नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा.
9/ 9
यासंबंधी माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा द्या, असं आवाहन सायबर विभागाकडून देण्यात आलं आहे.