नवी दिल्ली, 29 जानेवारी : दिल्लीमध्ये काँग्रेसच्या घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या काँग्रेस नेते (Maharashtra Congress) आणि मंत्र्यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलावलं आहे. राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदल आणि शेतकरी आंदोलन या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसचे मंत्री उद्या दिल्लीत जाणार आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांच्या आंदोलनावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद, महसूल मंत्री पद आणि विधीमंडळात काँग्रेस नेतेपद अशा तीन जबाबदाऱ्या आहेत. यातल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करण्याबाबत पक्षात हालचाली सुरू आहेत. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यासाठी नाना पटोले दिल्लीमध्येही गेले होते. पण प्रदेशाध्यक्षपदाबरोबरच त्यांनी मंत्रिपदाचीही मागणी केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. अण्णांचं आंदोलन दिल्लीच्या सीमेवर मागील दोन महिन्यांपासून अधिक काळ कृषि कायद्याविरोधात (Agricultural law) शेतकऱ्यांचं आंदोलन (Kisan Andolan) सुरू असताना आता अण्णा हजारे देखी सरकारविरोधात 30 जानेवारीपासून आमरण उपोषण (Hunger Strike)करणार आहेत. 2018 पासून अण्णा हजारे स्वामीनाथन आयोगाच्या सिफारशी लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडे विनंती करत आहेत. परंतु त्यांच्या विनंतीकडे लक्ष दिलं जात नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सरकारच्या या वृत्तीवर नाराज होऊन त्यांनी 30 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. राळेगणसिद्धीच्या यादव बाबा मंदिरात अण्णांचं उपोषण असणार आहे.