PHOTOS: ही आहे मृत्यू पाहून परतलेली महिला, महाड दुर्घटनेत 27 तासांनंतर पडली सुखरूप बाहेर
एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्याला सुरुवात झाली.
|
1/ 5
महाडमध्ये अनेक कुटुंबांचं वास्तव्य असणारी 5 मजली इमारत अचानक कोसळली आणि राज्यभरात खळबळ उडाली.
2/ 5
अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याने एनडीआरएफकडून युद्धपातळीवर बचावकार्याला सुरुवात झाली.
3/ 5
अचानक कोसळलेल्या या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकून आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
4/ 5
मात्र या भयानक दुर्घटनेतूनही लहान मुलानंतर आता एक महिला मृत्यूला हरवत सुखरूप बाहेर आली आहे. मेहरुन्निसा अब्दुल हमीद काझी असं 27 तासानंतर ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर पडणाऱ्या 60 वर्षीय महिलेचं नाव आहे.
5/ 5
दरम्यान, याआधी 18 तास ढिगाऱ्याखाली अडकलेला 6 वर्षीय मोहम्मद बागी हा सुखरूप बाहेर पडला आणि काही वेळासाठी सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू फुललं. मृत्यूशी संघर्ष करून बाहेर पडलेल्या मोहम्मद बागी या चिमुकल्याला नंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.