लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. पुण्यातील हॉटेल चालकाने मतदान जनजागृतीसाठी वेगळा फंडा वापरला आहे. मतदान केल्यानंतर 'एकावर एक मिसळ फ्री'चा उपक्रम राबवला हॉटेल चालकाच्या या फंड्यामुळं पुणेकरांनी आधी मतदानाला आणि नंतर मिसळ खायला रांगा लावल्या. फ्री मिसळ खाण्यासाठी बोटावर शाई असावी, अशी अट हॉटेलचालकाने घातली आहे. हॉटेल चालकाने दिलेल्या या ऑफरला मतदारांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला. फक्त मिसळच नाही तर चहासुद्धा स्वस्त दरात देण्यात येत होता. मतदान केल्याची शाई बोटावर दाखवून एका वृद्ध दाम्पत्याने चहा पीत असताना मतदान करण्याचं आवाहन केल.