20 मार्च हा दिन सर्वत्र जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. यादिवशी अनेक ठिकाणी चिमणी आणि त्यांचे पर्यावरणीय महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
2/ 10
वाढत्या वृक्षतोडीमुळे 80 टक्के चिमण्या नष्ट झाल्या आहेत, असं मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं व्यक्त केलं आहे.
3/ 10
वृक्षतोड होतच राहिल्याने साहजिकच झाडांची संख्या कमी झाली आणि चिमण्यांना घर करण्यासाठी जागा शिल्लक राहिली नाही. त्यामुळे काही ठोस पाऊले नाही उचलून आपण चिमणी वाचवू शकतो, हे काही जणांनी दाखवून दिले आहे.
4/ 10
पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी नेस्टी हा स्टार्टअप अमर संकपाळ आणि विशाल पाटील सांभाळत आहेत.
5/ 10
ही संस्था संस्था चिमण्यांसाठी एक कृत्रिम घर बनवून ना नफा ना तोटा तत्वावर विकते.
6/ 10
टाकाऊ साहित्यापासून चिमण्यांची कृत्रिम घरटी बनवली जातात, यांच्या माध्यमातून गरीब सुतारांना, महिला बचत गट यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो.
7/ 10
हे कृत्रिम घरटे पक्षांच्या सोयीच्या हिशोबाने शास्त्रीय दृष्ट्या बनवण्यात आल्याचे अमर संकपाळ यांनी सांगितले आहे.
8/ 10
चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि चिमण्या वाचण्यासाठी घरटी वाढदिवसाला, लग्न समारंभात किंवा इतर कोणत्याही आनंदाच्या क्षणी हे गिफ्ट म्हणून देता येऊ शकते.
9/ 10
अमर संकपाळ हे आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून आणि विशाल पाटील यांचे पर्यावरण अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. हे दोघेही आता चिमणी वाचवण्याचं काम करत आहेत.
10/ 10
गेल्या चार वर्षापासून ही संपूर्ण वृक्षप्रेमी टीम चिमणी वाचवण्याचं काम करत आहे.