2005 पासून पुराचा तडाखा कोल्हापुरचा थोड्याफार प्रमाणात बसतच आला आहे, त्यामुळे प्रशासन अगोदरच सतर्क राहते. यंदा प्रशासनाकडून पावसाचे प्रमाण वाढणार आहे की, नाही... धरणांतून कधी पाणी सोडण्यात येणार आहे, कोणती खबरदारी घ्यावी, याची माहिती पूरबाधित क्षेत्रांतील लोकांना मोबाईलवर मिळण्याची शक्यता आहे. कारण, प्रशासनाकडून मागील वर्षी (2021) आलेल्या पुराचा फटका बसलेल्या 409 गावांतील कुटुंबांचा एक डेटाबेस कोल्हापूर प्रशासनाने तयार केलेला आहे.