वडापाव म्हटलं की एका पावासोबत मिळणारा बटाटेवडा आपल्या नजरेसमोर येतो. पण याच वड्यासोबत मराठी चित्रपटाच्या व्हिलनचं नाव समोर आलं तर...
2/ 7
कोल्हापुरातल्या एका कॅफेमध्ये मराठी चित्रपटाच्या गाजलेल्या व्हिलन्सची नावं वडापाव आणि इतर पदार्थांना देण्यात आली आहेत.
3/ 7
कोल्हापूरकरांना काही तरी वेगळं खायला मिळावं म्हणून तीन मित्रांनी एकत्र येत हा कॅफे सुरू केलाय. या कॅफेची कल्पना पहिल्यापासूनच त्यांच्या डोक्यात होती.
4/ 7
कॅफेतील पदार्थांना व्हिल्सची नावं द्यायची ठरलं होतं. पण, कोणते व्हिलन्स घ्यायचे हे ठरत नव्हतं. आम्ही 90 च्या दशकातील मराठी चित्रपटसृष्टीत गाजलेल्या नावांचा आम्ही विचार केला. त्यांच्या भूमिकेप्रमाणे त्या पदार्थाला चव दिली, असं महाडिक यांनी सांगितलं.
5/ 7
कुबड्या खविस या नावाप्रमाणे थोड्या वेगळ्या फ्लेवरचा वडापाव, सगळ्यांपेक्षा वरचढ ठरणारा तात्या विंचू म्हणून त्याचा नावाचा वडापाव सगळ्यात जास्त लोडेड आहे
6/ 7
या ठिकाणी वडापाव पिझ्झा हा वेगळा प्रकार देखील खायला मिळतो. आपण पिझ्झा हे वेगवेगळ्या प्रकारचे बघतो, त्यांपैकीच एक वडापाव पिझ्झा इथं मिळतो.
7/ 7
कोल्हापूरमध्ये सामान्यतः वडापाव हा 10 रुपयांना मिळतो. पण व्हीलेन्स अड्डा या ठिकाणी 12 ते 40 रुपये अशी वडापावची किंमत त्याचबरोबर 80 ते 120 रुपयांना वडापाव पिझ्झा आणि 90 ते 160 रुपयांना स्नॅकी टॉवर मिळतात