दिवसा कडक उन्ह आणि संध्याकाळी ढगाळ वातावरणाची स्थिती कोल्हापुरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना विचित्र वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. या वातावरणामुळे अंगदुखी, डोकेदुखी अशा समस्या वाढू लागल्या आहेत. कोल्हापुरात काल (24 मे) रोजी कमाल तापमान 36° सेल्सिअस तर किमान तापमान 24° सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तसेच आज (25 मे) रोजी देखील कमाल तापमान 36° सेल्सिअस तर किमान तापमान 24° सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान आज अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची तर काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तण्यात आली आहे.