महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळणारे कडक उन्हाचे वातावरण पुढचे काही दिवस देखील कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोल्हापुरात देखील तळपत्या उन्हातच नागरिकांना त्यांची नित्याची कामे करावी लागत आहेत. त्यामुळे भर उन्हात काम करताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान कोल्हापुरात काल (20 मे) रोजी कमाल तापमान 39.6° सेल्सिअस तर किमान तापमान 23.6° सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर आज (21 मे) रोजी कमाल तापमान 37° सेल्सिअस तर किमान तापमान 23° सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.