सध्या महाराष्ट्रात सर्वत्र कडक ऊन पाहायला मिळत आहे. कोल्हापुरातील नागरिक देखील या उष्म्यामुळे हैराण झाले असून थंड पेयांच्या गाड्यांचा आधार त्यांना घ्यावा लागत आहे. दरम्यान हवामान खात्याने देखील होत असलेल्या उष्मा घाताच्या घटनांमुळे कडक उन्हात काम करण्याचे टाळावे, असे सांगितले आहे. कोल्हापुरात काल (19 मे) रोजी कमाल तापमान 38.4° सेल्सिअस तर किमान तापमान 24.1° सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर आज (20 मे) रोजी देखील हे तापमान सारखेच अर्थात कमाल 38° सेल्सिअस आणि किमान 24° सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.