.यंदाचा उन्हाळा हा जास्तच उष्ण असल्याचे सध्या सर्वत्र जाणवत आहे. कडक उन्हामुळे नागरिकांच्या जीवाची काहीली होत आहे.
2/ 5
महाराष्ट्रासह कोल्हापुरातील नागरिकांनी वळवाच्या पावसाच्या सरी झेलल्या असल्या तरी देखील अजून काही दिवस या उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
3/ 5
यंदा मान्सून देखील लांबणीवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सध्या तरी उन्हापासून बचाव करतच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
4/ 5
कोल्हापुरात काल (18 मे) रोजी कमाल तापमान 38° सेल्सिअस तर किमान तापमान 23° सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे.
5/ 5
दरम्यान आज (19 मे) रोजी कमाल तापमान 38° सेल्सिअस तर किमान तापमान 22° सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.