आयुष्यातील उतार वयात वृद्ध लोक बराचसा वेळ हा आपल्या नातवंडात घरीच घालवणे पसंत करतात. पण काही अवलीयांनी आपले संपूर्ण आयुष्यात समाजासाठी देऊ केलेले असते. असाच एक अवलिया सध्या सायकलवरून भारत भ्रमंती करतोय.
2/ 8
दिल्ली आयआयटीतील माजी प्राध्यापक असलेले 74 वर्षीय पद्मश्री डॉ. किरण सेठ हे सध्या त्यांच्या सायकलवरून अख्खा भारत फिरत आहेत.
3/ 8
ऑगस्ट महिन्यात सुरू झालेला त्यांचा श्रीनगर ते कन्याकुमारी हा प्रवास त्यांनी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण केला आहे. तर सध्या ते परतीच्या सायकल प्रवास करत असून कोल्हापुरात आले होते.
4/ 8
2009 मध्ये डॉ. सेठ यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. तर 'स्पिक मैके' या संस्थेचे ते संस्थापक आहेत.
5/ 8
इतके जास्त वय असताना देखील साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या गांधी विचारांचा प्रभाव असणारे डॉ. सेठ हे फक्त एक साधी सायकल आणि तीन जोड कपड्यांसह अख्खा देश फिरत आहेत.
6/ 8
सायकलिंग बाबत जनजागृती करणे, स्पिक मैकेच्या भारतीय संस्कृतीचे जतन संवर्धन यासाठी स्वयंसेवक जोडणे आणि गांधी विचारांचा प्रचार-प्रसार करणे ही उद्दिष्ट्ये घेऊन ते ही सायकल भ्रमंती करत आहेत.
7/ 8
या भारत भ्रमंती दरम्यान अनेक अडथळ्यांचा सामना करत ते रोज कित्येक किलोमीटर सायकल चालवतात. तर प्रत्येक गावी, शाळा-कॉलेज या ठिकाणी भेटी देत पुढे जात आहेत.
8/ 8
दरम्यान त्यांच्या या भारत भ्रमंतीसाठी डॉ. सेठ यांचे प्रत्येक ठिकाणी जल्लोषात स्वागत केले जात आहे. तर त्यांच्या मोहिमेसाठी शुभेच्छा देत, त्यांना पुढच्या प्रवासासाठी निरोप दिला जातो आहे.