दाक्षिणात्य पदार्थांना नॉनव्हेजचा तडका देऊन खाण्याची पद्धत अनेक ठिकाणी आहे.
2/ 9
कोल्हापूरकरही गेल्या 18 वर्षांपासून डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली अंडा डोसा ही डिश मोठ्या आवडीनं खात आहेत.
3/ 9
कोल्हापूरच्या शास्त्री नगर रोडवर बेस्ट अंडा डोसा अशी दस्तगीर इलाई भालदार यांचा अंडा डोसाचा गाडा आहे. या गाड्यावर ही डिश मिळते.
4/ 9
काहीतरी नवा पदार्थ बनवण्याचा विचार मी केला. त्यामधूनच या डिशची कल्पना सुचली,' असं दस्तगीर भालदार यांनी सांगितलं.
5/ 9
सध्या डोश्याला अंड्याचे ऑम्लेटचा टच देऊन हा अंडा डोसा बनवला जातो. सुरुवातीला तव्यावर साधा डोसा तयार करून घेतला जातो. त्यावर मेतकुट, कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी, घरीच बनवलेली शेजवान चटणी टाकली जाते.
6/ 9
यावरच अंडे फोडले जाते. मग ते व्यवस्थित एकत्र करून डोश्यावर सगळीकडे पसरवले जाते. अशा प्रकारे हा अंडा डोसा तयार होतो.
5 अंडी, 8 अंडी, 10 अंडी आणि 20 अंडी असणारे डोसे देखील ते बनवून देतात.
9/ 9
एखाद्या अनोख्या डिशची चव चाखायला कोल्हापूरकर नेहमीच उत्सुक असतात. पण, गेली 18 वर्षे हा कोल्हापूरकरांच्या जिभेला पसंत पडलेला अंडा डोसा आजही एक नवीन डिश असल्याप्रमाणेच विकला जातोय.