तुळशीमाळ ही वारकऱ्याची ओळख आहे. मात्र, याच वारकऱ्याची सध्या फसवणूक होताना दिसत आहे. वारकरी खऱ्या तुळशीऐवजी चायना माळ घेताना दिसत आहेत. ही तुळशीमाळ हातापासून बनवली जाते. माळा तयार झाल्यावर तिच्या मण्याला लहान होल असते. मात्र, कोणत्याही लाकडापासून मशीनवर बनविलेल्या तुळशी माळेच्या मण्याला मोठे होल असते. जुन्या वारकऱ्यांना हे लगेच ओळखून येते.