राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होतंय. मराठा आरक्षण, दुष्काळ, शेतकरी आत्महत्या असे अनेक विषय या अधिवेशनात गाजणार आहेत. तर विरोधकांचे हल्ले परतून लावण्यासाठी सरकारनेही कंबर कसलीय.
2/ 6
दर वाढून दयावी या मागणीसाठी ओला आणि उबेर टॅक्सी चालकांचा आज विधिमंडळावर मोर्चा आहे. ओला-उबेर बंद असल्यानं प्रवाशांचे हाल होणार आहे. तर इतर टॅक्सीचालक भाव वाढून घेतील. त्यामुळं घराबाहेर निघताना संपाचं लक्षात असू द्या.
3/ 6
नवी मुंबईतलं सर्वाच्या आकर्षणाचं केंद्र असलेलं बावखळेश्वर महादेव मंदिर पालिका प्रशासन आज पाडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी हे मंदिर बांधलं होतं. मात्र ते मंदिर अवैध जागेवर बांधलं असल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. प्रशासनाला आता कारवाई करणं भाग आहे.
4/ 6
रिझर्व्हे बँकेच्या नियामक मंडळाची बैठक आज मुंबईत होतेय. बँकेचे संचालक उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. सरकार आणि बँकेत मतभेद असल्याच्या बातम्या गेली काही दिवस येत आहेत. सरकारनं नेमलेले प्रतिनिधी एस. गरूमुर्ती हे या बैठकीला उपस्थित राहणार असून वाद होण्याची शक्यता आहे.
5/ 6
भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मध्यप्रदेशात प्रचारासाठी येत आहेत. शहा हे भोपाळमध्ये रोड शो करणार असून योगींच्या महूमध्ये प्रचारसभा आहेत.
6/ 6
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज जयंती आहे. इंदिराजींची समाधी असलेल्या दिल्लीतल्या शक्तिस्थळ इथं सर्व मान्यवर आदरांजली वाहणार असून सर्वधर्म प्रार्थनेचही आयोजन करण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शक्तिस्थळावर येणार आहेत.