धबधब्यांवर तोबा गर्दी; पर्यटकांचा उत्साह थांबेना मग कोरोना कसा थांबणार?
अजित मांढरे, प्रतिनिधी -
पर्यटनस्थळांवर बंदी असतानाही नागरिकांचा उत्साह थांबत नाहीये आणि मोठ्या प्रमाणात धबधब्यांवर गर्दी करताना दिसत आहे. मात्र, यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण दिलं जात आहे इतकं निश्चित.
ठाण्यातील मुंब्रा येथे मुंब्रा देवी डोंगरावर असलेल्या धबधब्यावर रविवारी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली.
2/ 7
सध्या करोनाचा काळ असल्यामुळे राज्यात कलम 144 म्हणजेच जमावबंदीचा आदेश लागू आहे.
3/ 7
शिवाय ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ठाण्यातील सर्वच धबधबे, नद्या, तलाव आणि पर्यटन स्थळे या सर्वच ठिकाणी नागरिकांना जाण्यास मनाई आहे.
4/ 7
असं असताना देखील मुंब्रा येथील बायपासवरील मुंब्रा देवी डोंगरातील धबधब्यावर आज सकाळपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.
5/ 7
धक्कादायक म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जात नसून एकाही नागरिकाने मास्क घातलेला नाहीये.
6/ 7
यामुळे मुंब्र्यात जमावबंदीचे आदेश किंवा पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई आदेश लागू होत नाही का? असा देखील प्रश्न निर्माण होतोय
7/ 7
एकीकडे डेल्टा प्लस या करोनाच्या नवीन व्हायरसमुळे अनेक ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.