गावोगावी मासळीचा व्यवसाय करणाऱ्या शेवंताबाई गायकर यांच्या घरावर वादळी वाऱ्यानं झडप घातली.
|
1/ 5
पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मलंगगड परिसरातील आणि कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील शिरवली गावात राहणाऱ्या शेवंताबाई गायकर यांच्या घराचे पत्रे उडाले. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. सध्या त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.
2/ 5
ग्रामीण भागात गावोगावी मासळीचा व्यवसाय करणाऱ्या शेवंताबाई गायकर यांच्या घरावर वादळी वाऱ्यानं झडप घातली.
3/ 5
वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या घराचे नुकसान झाले. छतावरील पत्रे उडाले असून शेवंताबाई यांच्या पाच मुलींसह त्यांना आता उघड्यावर आपला संसार मांडला लागला आहे.
4/ 5
कोरोना आणि लॉकडाऊन काम देखील बंद असल्याने उडालेली पत्रे घरावर बसवायचे तरी कसे? असा प्रश्न शेवंताबाईंसमोर उभा आहे.
5/ 5
घरात असलेले अन्नधान्य हे पावसानं भिजलं असून शासनाची कोणत्याही प्रकारची मदत अद्याप पोहोचली नाही.