

कालपरवापर्यंत सोन्याचे दर 31 हजाराच्या घरात होते.मात्र आज सोन्यानं 33 हजारापर्यंत उसळी घेतलीय.


एवढंच नव्हे तर भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळं ऐन लगनसराईच्या तोंडावर सोन्यानं भाव खाल्लाय.


शेअर बाजारातली चढउतार, डॉलरच्या तुलनेत असलेलं रुपयांचं मूल्य, आंतरराष्ट्रीय बाजारातली कच्च्या तेलाची किंमत यासारख्या अनेक घटकांवर सोन्याचे दर कमीजास्त होत असतात.


सोन्याचा 33 हजाराचा दर कायम राहिला तर दागिने बनवण्यासाठी खिसा जरा जास्तच रिकामा करावा लागणार आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात झालेली वाढ आणि रुपयाची घसरण सुरू आहे. त्याचा हा परिणाम आहे.


सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळत आहे.


मागील एक दीड महिन्यात ३१ हजार रुपये दर असलेलं सोन आज प्रतितोळा 33000 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.


सोन्यातील गुंतवणूक कधीच वाया जात नसल्याचं सांगत काही ग्राहकांनी या वाढत्या दरात देखील सोने खरेदी सुरूच ठेवली असल्याचं पाहायला मिळत आहे.