रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध मंदिर गणपतीपुळे येथील समुद्र किनारी बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. तर, एकाला वाचवण्यात यश आलं आहे.
2/ 5
पाण्याचा अंदाज न आल्यानं खोल पाण्यात जाणं या पर्यटकांच्या जीवाववर बेतलं आहे. दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
3/ 5
बुडालेले पर्यटक हे पश्चिम महाराष्ट्र म्हणजेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
4/ 5
पाण्याचा अंदाज न आल्यानं सांगली जिल्ह्यातील 23 वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू झाला आहे. तर, त्याच्या मित्राला मात्र यावेळी वाचवण्यात आलं आहे.
5/ 5
या दुर्घटनेत प्रनेश वसगडेकर, वय 23 वर्षे, सांगली जिल्हा याचा मृत्यू झाला आहे. त्याचे तीन मित्र ओंकार मेहतर वय 26 वर्षे, कोल्हापूर जिल्हा, वैभव जगताप वय 25 वर्षे, सांगली जिल्हा, पृथ्वीराज पाटील वय 24 वर्षे, सांगली जिल्हा यांना वाचवण्यात यश आलं आहे.