विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात दुर्वाची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे.
|
1/ 5
कोरोनाच्या महासंकटातही राज्य सरकारची नियमावली पाळून देशात गणरायाचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सवानिमित्तानं विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुंदर आरास करण्यात आली आहे.
2/ 5
गणरायाला शांत करण्यासाठी थंड गुणधर्म असणाऱ्या दुर्वांचा वापर केला जातो. त्यामुळे गणेशपूजनात दुर्वांना महत्त्व आहे. गणरायाला 21 दुर्वांचा हारही वाहतात.
3/ 5
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला यंदाच्या गणेशोत्सवात याच दुर्वांची सुंदर आरास करण्यात आली आहे. मंदिराच्या संपूर्ण गाभारा हा दुर्वांनी सजवण्यात आला आहे. या दुर्वांवर गणरायाचं चित्र लावण्यात आलं आहे.
4/ 5
विठुरायाला हिरव्या-पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान केली आहेत.
5/ 5
रुक्मिणीला पोपटी रंगावर जांभळ्या रंगाचे काठ असलेली वस्त्र परिधान कऱण्यात आली आहेत. विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व मंदिरात दुर्वाची सुंदर अशी आरास करण्यात आली आहे.