माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला, त्यांच्या कारला डंपरनं धडक दिली. डॅाक्टर दीपक सावंत आज सकाळी पालघरला जाण्यासाठी निघाले होते, याच वेळी काशिमीरा भागात त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघातामध्ये दीपक सावंत हे जखमी झाले असून, त्यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे. डॅाक्टर दिपक सावंत यांना तातडीनं उपचारासाठी अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सावंत हे पालघरच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करायला निघाले होते, याचवेळी हा अपघात झाला.