Home » photogallery » maharashtra » EKNATH SHINDE BECOME FOURTH CM OF MAHARASHTRA FROM SATARA DISTRICT MHSA

Photo: यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे; सातारा जिल्ह्याला चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा मान

Fourth CM of Mahrashtra from Satara District: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ घडून आली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदारांच्या पाठिंब्यावर भाजप सरकार स्थापन करेल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं वाटत असतानाच अचानक एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, असं दस्तरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आणि सर्वांनाच धक्का बसला. आज संध्याकाळी 7 वाजता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल. एकनाथ शिंदेंच्या रुपात सातारा जिल्ह्याला चौथ्यांदा मुख्यमंत्रीपद भुषवण्याचा मान मिळणार आहे. यापूर्वी यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भुषवणार आहेत.

  • |