नागपूर शहरातील उत्तर अंबाझरी मार्गावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कार फोडल्याची घटना समोर आली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते संदेश सिंघलकर यांची कार फोडण्यात आली आहे. दोन तरुणी आणि तीन तरुणांच्या गोंधळातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खरे टाऊन परिसरात बुधवारी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी काँग्रेसचे कार्यकर्ते संदेश सिंगलकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.