मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिष्टमंडळासमवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने पाऊले उचलण्याबाबत राष्ट्रपतींना विनंती करणारे पत्र दिले. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, नाना पटोले यांचा समावेश होता.