

कोरोनाचा पराभव करून घरी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण केलं.


देवेंद्र फडणवीस यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी मुंबईतल्या सरकारी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.


घरी आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट.. 'आज रुग्णालयातून घरी परतलो. सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही सर्व कर्मचारी वृंद यांचा, त्यांनी केलेले सहाय्य, घेतलेली काळजी, उपचार यासाठी मी अत्यंत आभारी आहे. मला लवकर बरे वाटावे, यासाठी ज्यांनी सदिच्छा दिल्या, त्यांचेही अनंत आभार!'


देवेंद्र फडणवीस यांना पुढील 10 दिवस डॉक्टरांनी घरीच विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ते आता होम क्वारंटाईन होणार आहेत. फडणवीस त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर राहणार आहेत.