छत्रपती संभाजीनगरमधील ऐतिहासिक ठेवा असलेल्या पानचक्कीतील दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने खळबळ उडाली आहे.
2/ 8
डोंगरातून आलेली नहर या पानचक्कीला पाणीपुरवठा करते. मात्र, उन्हाळा लागताच पाण्याची कमतरता शहराला भासू लागली आणि बऱ्याच ठिकाणी नागरिकांनी या नहरीवरच मोटर टाकायला सुरुवात केली.
3/ 8
यामुळे पानचक्कीला पाणीसाठा कमी झाला. पाणीपुरवठा कमी झाल्यामुळे पानचक्कीतील पाणी कमी होत गेले आणि उरलेल्या दूषित पाण्यामुळे या माशांचे मृत्यू झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
4/ 8
यामध्ये अडीच ते तीन हजार मासे असल्याची माहिती समोर आली आहे.
5/ 8
दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या माशांना गोण्यांमध्ये भरून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
6/ 8
दररोज देशभरातून हजारो पर्यटक येतात पानचक्की पाहण्यासाठी येत असतात.
7/ 8
काही दिवसांपूर्वी शहराच्या नामांतरावरुन वाद निर्माण झाला होता. नामांतराला समर्थन आणि विरोध करणाऱ्यांनी शहरात मोर्चे काढले होते.
8/ 8
मात्र, शहरातील ऐतिहासिक ठेवा जपण्याठी कोणी मोर्चे काढणार का? असा प्रश्न सर्वसामान्य लोक उपस्थित करत आहेत.