संभाजीनगरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून एसपीजीचे विशेष कमांडो मॉक ड्रील करत आहेत. सुरूवातीला एसपीजीच्या या टीमने जगप्रसिद्ध लेण्यांमध्ये रंगीत तालीम केली. लेण्यांमध्ये मॉक ड्रील झाल्यानंतर रामा इंटरनॅशनल या फाईव्ह स्टार हॉटेलमध्येही रंगीत तालीम पार पडली. संभाजीनगरमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर यंत्रणा सज्ज असल्या पाहिजेत, यासाठी हे मॉक ड्रील घेण्यात आलं. हेलिकॉप्टरमधून उतरून ते थेट हॉटेलमध्ये बंदुका घेऊन जाईपर्यंत एसपीजी कमांडोंचं हे मॉक ड्रील झालं. वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून अशाप्रकारचं मॉक ड्रील घेतलं जातं.