संपूर्ण मराठवाडा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच तापलाय. छत्रपती संभाजीनगरही त्याला अपवाद नाही. वाढत्या तापमानामुळे छत्रपती संभाजीनगरमधील रस्त्यांवर दुपारी तुरळक गर्दी असते. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवार (24,मे) कमाल 24 अंश सेल्सिअस एवढे तापमान होते. आणि कमाल तापमान हे 40 अंश सेल्सियस होते आज गुरुवार (25, मे) किमान तापमान हे 24°c अन सेल्सिअस एवढे असेल आणि कमाल तापमान 40°c अंश सेल्सिअस एवढे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आगामी काही दिवसही संभाजीनगरमधील तापमान जास्त राहणार असल्यानं नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना प्रशासनानं केली आहे.