महाराष्ट्रात सर्वत्र उन्हाळ्याची लाट सुरू आहे. यामुळे नागरिक त्रस्त असून मराठवाड्यात अजून तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये या आठवड्यात सर्वात जास्त तापमानाची नोंद झाली आहे. तर अजूनही तापमान वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये रविवार (21 मे) किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 41 अंश सेल्सियस होते. आज सोमवार, 22 मे रोजी किमान तापमान हे 24°c तर कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस एवढे असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांनी उन्हात शेतीची कामे करू नये, असे आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.