बीडमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिरे आणि शिल्प आहेत. त्यातील कंकालेश्वर मंदिर हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. मंदिर सोन्याप्रमाणे चमकणारे आहे. म्हणूनच या मंदिराचे नाव कंकालेश्वर पडले असावे, असे इतिहासकार सांगतात. जलकुंडात असणारे हे मंदिर नेहमीच भाविकांसाठी आकर्षण ठरते. महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी मोठ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येते मंदिरासाठी त्याच परिसरातील दगडांचा वापर करण्यात आला आहे, मंदिरावर पाश्चात्त्य संस्कृतीतील मूर्तींचे कोरीव काम केलेलं आहे. चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा याने हे मंदिर 11 ते 12 शतकात बांधल्याचा अंदाज आहे.