बीड जिल्ह्यातील काही शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करत आहेत.माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथील शेतकरी परशुराम करे हे दोडका शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत.
बीड जिल्हा हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात हंगामी शेती केली जाते.
2/ 11
बीड जिल्ह्यातील काही शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करत आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदाही होत आहे.
3/ 11
माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथील शेतकरी परशुराम करे हे प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांनी अर्धा एकर क्षेत्रावर दोडका लावला आहे.
4/ 11
अर्धा एकर क्षेत्रावर युवरा 1212 जातीचा दोक्याची लाववड केली. त्यासाठी त्यांना 20 हजार रुपयांचा खर्च आला.
5/ 11
दोडक्याच्या शेतीसाठी मल्चिंग, ठिबक फवारणी केली. तीन महिन्यानंतर दोडक्याचे उत्पन्न सुरू झाले.
6/ 11
आतापर्यंत जवळपास 4 टन दोडक्याची विक्री बाजारपेठेत झाली आहे. तर आणखी उत्पन्न सुरूच आहे.
7/ 11
दोडक्याला बाजारात 50 ते 55 रुपये प्रतिकिलो दर आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
8/ 11
दोडका हे कमी कालावधीन चांगले उत्पन्न देणारे पीक आहे. मात्र त्याची योग्य ती काळजी घ्यावी लागते.
9/ 11
दोडक्याच्या वेलीला नागआळी, किडा, पानावरील रोग प्रतिबंधक औषधी वेळोवेळी फवारणी करावी लागते. वेलीवर विघ्न न पडण्यासाठी सतर्क रहावे लागते.
10/ 11
दोडक्याचा वेल वीस फुटांपर्यंत लांब जातो त्यामुळे योग्य ती बांधणी केल्यास जास्तीत जास्त फळे मिळवता येतात.
11/ 11
पूर्वी मी पारंपारिक शेती करत होतो मात्र यंदा आधुनिक शेतीचा निर्णय घेतला. त्यामुळे कमी खर्चात आणि कमी काळात मला लाखोंचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी परशुराम करे सांगतात.